Tuesday, 12 July 2011

पृथ्वीवरील संजीवनी ... आता उघडा... खा.... आणि निरोगी रहा...


गवत सगळीकडे आणि सर्वदूर आढळते. पण, त्यातील रोगनिवारक घटक आणि जादूच्या
खजिन्याचा शोध लावला तो डॉ. एन. विग्मोर या अमेरिकेतील महिला निसर्गोपचार
तज्ज्ञाने....
डॉ.विग्मोर यांचा जन्म सन १९१० मध्ये लिथूयानात झाला. जन्मतःच आजारी बाळ
अशी त्यांची अवस्था होती. त्यांच्या नशीबाने त्यांच्या आजीला फळे, फुले,
पाने, वनस्पती यांच्यातील औषधी गुणधर्माचे बरेचसे ज्ञान होते. पहिल्या
महायुध्दाच्या काळात जखमी सैनिकांना वनस्पती वापरुन आजीने बरे केल्याचे
डॉ. विग्मोर यांनी पाहिले होते. त्यामुळे नैसर्गिक उपचाराचे बाळकडू
त्यांना मिळाले होते.
वयाच्या सोळाव्या वर्षी डॉ. विग्मोरना अपघात झाल्याने घोट्याजवळ दुखापत
झाली. त्याचे नंतर गँगरिनमध्ये रुपांतर झाले. डॉक्टरांनी पाय कापून
टाकण्याचा सल्ला दिला. आई, वडिल आणि डॉक्टरांच्या इच्छेविरुध्द जाऊन डॉ.
विग्मोर यांनी हॉस्पिटलला रामराम ठोकला. बालपणापासूनच वनस्पतींच्या औषधी
गुणधर्माशी परिचित असलेल्या डॉ. विग्मोरनी त्या जखमेवर गव्हाच्या
तृणांकुराचा प्रयोग केला आणि त्या -या झाल्या. पाय कापण्याचा सल्ला देणा-
या डॉक्टरांनीच त्यांना गँगरिन पूर्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र दिले. नंतर
त्यांनी बोस्टनमधील एका मॅरेथॉनमध्ये भागही घेतला. गँगरिनसाठी गव्हाच्या
तृणांकुराचा वापर केल्याने आपले बाकीचे शारीरिक आजारही बरे झाले असल्याचे
त्यांच्या त्यावेळी लक्षात आले. त्यानंतर गवताच्या अनेक प्रकारांवर
अभ्यास करुन त्यांनी असा निष्कर्ष काढला की, गव्हाचे गवत हे
पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ गवत आहे. त्यानंतर त्यांनी गव्हाच्या
तृणांकुराचा उपचार करणारे केंद्र काढून हजारो लोकांना रोगमुक्त केले. या
ठिकाणी आलेल्या अनुभवांवर आधारित विविध पुस्तके लिहिली. भारतातही बॉम्बे
हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी विविध प्रयोग केले. या प्रयोगांचे निकालही
उत्साहवर्धक आहेत.
अशा प्रकारची पृथ्वीवरील संजीवनी शोधणा-या डॉ.विग्मोर यांचे दि.
फेब्रुवारी १९९४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी उपचार केंद्राला लागलेल्या
आगीत धुरात घुसमटल्याने निधन झाले.
गव्हांकुरातील महत्त्वाचे घटक
)      जीवनसत्व या जीनसत्वामुळे डोळ्याचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
रातांधळेपणा टळतो. नाक, कान, घशात वारंवार होणारा जंतुस्पर्श टळतो.
डोळ्याखालची काळी वर्तुळे, राठ केस, सुरकुत्या अशा तक्रारी या
जीवनसत्वामुळे टळतात. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हे जीवनसत्व
अत्यावश्यक आहे.
)      जीवनसत्व बीमज्जासंस्था, पचनसंस्था यांच्या विकारात उपयुक्त
जीवनसत्व, भूक लागणे, बेरीबेरी, वारंवार तोंड येणे, अकाली वृध्दत्व,
मानसिक स्वास्थ बिघडणे, निद्रानाश या तक्रारीत हे जीवनसत्व उपयुक्त आहे.
काही तज्ज्ञांच्या मते बी जीवनसत्वातील बी १७ (लिट्राइल) हा
कॅन्सरसारख्या रोगात उपयोगी पडणारा महत्त्वाचा घटक आहे.
)      जीवनसत्व सीदात, हिरड्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे
जीवनसत्व, रोग प्रतिकारशक्ती  वाढवते, उत्कृष्ठ नैसर्गिक अँण्टीबायोटिक,
हे जीवनसत्व यौवनाला उत्साह देते, जखमा लवकर भरुन निघण्यास मदत करते.
)      जीवनसत्व प्रजननासाठी उपयुक्त जीवनसत्व, यामुळेच वंध्यत्व आणि
गर्भपात टाळता येतो. चरबीचे चयापचय होते. पुरुषबीजाची कार्यक्षमता
वाढवते. मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार यासारख्या डिजनरेटीव डिसीजेसमध्ये
उपयोगी. निरोगी वृधत्वासाठी आवश्यक जीवनसत्व. मासिक पाळीच्या विविध
तक्रारी दूर करणारे जीवनसत्व.
)      क्षारक्षारांशिवाय जीवन अशक्य असे क्षारांचे आपल्या शरीरातील
महत्त्व आहे. पेशींना आवश्यक असणा-या क्षारांमुळे शरीरातील आम्ल अल्कली
समतोल टिकतो. हाडांचे आरोग्य, वृध्दावस्था, शरीरावर सूज, रक्तस्त्राव,
रक्ताभिसरण मंदावणे, बेचैनी, रक्त लवकर गोठणे, संथचाल, व्हेरिकोज
व्हेन्स यासाठी उपयुक्त असणारा कॅल्शियम क्षार, अँनेमिया, गर्भावस्था,
थकवा, थंड घाम येणे, त्वचा पिवळसर दिसणे, धाप लागणे, आळस, निद्रानाश अशा
तक्रारीत उपयुक्त असणारा लोह क्षार. पचन आणि शरीरशुध्दी, आम्ल अल्क
समतोल, मूतखड्यांचा त्रास यासाठी उपयुक्त सोडियम क्षार, यौवन, सौंदर्य,
निद्रानाश, उच्च रक्तदाब, स्मरणशक्तीचा नाश, थकवा, आत्महत्त्येची
मानसिकता यात उपयुक्त असणारा पोटॅशियम क्षार, आतडे, स्नायू यांचे आजार,
कावीळ, पाळी उशीरा येणे, हगवण, बध्दकोष्ठता, दातांच्या तक्रारी, सर्दी
पडसे, दुर्गंधीयुक्त शौच यासाठीचा मॅग्नेशियम क्षार, केसांचे आरोग्य,
प्रोस्टेट ग्रंथींचे आरोग्य, सुदृढ ठेवणारा झिंक क्षार, विविध प्रकारच्या
कॅन्सरमध्ये उपयोगी ठरलेला सेलेनियम क्षार यांचा यात भरपूर साठा आहे.
)      पाचक रस (एन्झाइम्स) – गव्हाच्या तृणांकुरात अनेक प्रकारचे एन्झाइम्स
आहेत. हा उद्दीपक घटक असल्याने शरीरातील प्रत्येक क्रियेत त्याची गरज
असते. याच्या अभावाने शरीर कमकुवत आणि क्षीण दिसते. गव्हांकुर म्हणजे
एन्झाइम्स पुरवणारी बँकच आहे.
)      प्रोटिन्स आणि अमायनो असिडसप्रोटिन्सला आहारशास्त्रात मानाचे स्थान
आहे. पेशींची निर्मिती, शरीराची वाढ यासाठी प्रोटिन्स उपयुक्त ठरतात.
अन्टीबॉडी, प्लाजमा, हार्मोन्स हे प्रोटिन्सपासून बनतात. गव्हाच्या
तृणाकडे वनस्पतीजन्य प्रोटिन्स मिळण्याचे प्रभावी स्थान म्हणून आहार
तज्ज्ञ पहात आहेत.
क्लोरोफीलनिसर्गातील जादूच
गव्हाच्या तृणातील हा महत्त्वाचा घटक म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. सत्तर
टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला हा घटक हिमोग्लोबिनमधील हेमिन
नावाच्या घटकाशी प्रचंड साधर्म्य असणारा घटक आहे. म्हणूनच गव्हाच्या
तृणांकुराला हिरव्या रक्ताची उपमा देतात. पांडूरोगात म्हणूनच ते खूप
उपयुक्त आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त डॉ. हन्स फिसचर यांनी माणसाचे रक्त
आणि क्लोरोफील यांचा अणू जवळपास सारखाच असतो हे सिध्द केले आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीन, अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी यामधील वृत्तानुसार
क्लोरोफील उत्तम जंतुनाशक असल्याने ते रक्तशुध्दी करुन अनेक रोगांचा
नायनाट करते. पांडूरोग, क्षय, आतड्याची सूज, जठराचा अल्सर यात ते उपयोगी
ठरते. अमेरिकेच्या लोमालिंडा विद्यापीठाच्या मायक्रो बायोलॉजी विभागाने
केलेल्या संशोधनानुसार क्लोरोफील किरणोत्सर्ग, गाड्यांचा धूर, सिगारेटचा
धूर यांचा शरीरावर दुष्परिणाम होऊ देत नाही. डॉ. बर्चर यांच्या मते
क्लोरोफीलने हृदयाचे, आतड्याचे मूत्राशयाचे फुफ्फुसाचे कार्य सुधारत
असल्याने कुठल्याही महागड्या कृत्रिम टॉनिकपेक्षा ते सर्वोत्तम टॉनिक
आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सोसायटी यात आर.डब्ल्यू.यंग यांनी १९८०
मध्ये लिहिलेल्या लेखानुसार क्लोरोफिलमुळे शरीराची दुर्गंधी कमी होते.
डॉ.मॉरीसिटा आणि डॉ.कॅनो होटा या जपानी शास्त्रज्ञांनी हे सर्वोत्तम
जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशक असल्याचे लिहिले आहे. क्लोरोफिल- नेचर ग्रीन
मॅजिक या पुस्तकात डॉ. रुडॉल्फ यांनी हिरड्यातून रक्त येणे, तोंडातील
व्रण, पायोरिया .यात क्लोरोफिल गुणकारी असल्याने त्याचा दंतमंजनासाठी
उपयोग होऊ शकतो असे नमूद केले आहे. जी. ग्रुसकीन यांनी जर्नल ऑफ सर्जरी
मध्ये लिहिलेल्या लेखानुसार श्वसनसंस्थेतील जंतुसंसर्ग आणि सायनसचा त्रास
क्लोरोफिलने कमी होतो. अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरीमध्ये डॉ. गोल्डबर्ग यांनी
यूज ऑफ क्लोरोफिल इन सेप्सीस या आपल्या लेखात क्लोरोफिलने जखमा लवकर
भरतात असे लिहिले आहे. यूरोलॉज या जर्नलमध्ये १९८२ साली आलेल्या
वृत्तानुसार क्लोरोफिल मूतखड्याच्या रुग्णांना उपयुक्त असल्याचे तर
मुटेशन रीसर्च या जर्नलमध्ये डॉ. ऑलव्हेश यांनी त्यामुळे किरणोत्साराची
तीव्रता कमी होते असे म्हटले आहे.
क्लोरोफिल हे कॅन्सर विरोधी असल्याचे डॉ.सी.एन.लाय या तज्ज्ञाने
न्यूट्रीशन अँड कॅन्सर या पुस्तकात सन १९७९ मध्ये लिहून ठेवले आहे. टेंपल
युनिव्हर्सिटी, फिलाडेपीयाच्या डर्माटॉलॉजी विभागाचे प्रो, राईट यांच्या
मतानुसार त्वचारोगात क्लोरोफिल उपयोगी सिध्द झाले आहे. पॅरिस हॉस्पिटलचे
डेन्टीस्ट डॉ. होमर जुडकिन यांनी हिरड्यात क्लोरोफिलची इंजेक्शने देऊन
पायोरियाचे रुग्ण बरे केले आहेत.  जनरल मोटर्सच्या चार्लस केटरिंग यांनी
एका महाविद्यालयात क्लोरोफिलवर संशोधन करण्यासाठी दरवर्षी तीन हजार
अमेरिकन डॉलर याप्रमाणे सलग चार वर्षे खर्च केला होता.
अशा या क्लोरोफिलच्या प्राप्तीसाठी गव्हाच्या तृणांकुराचा पर्याय
सर्वश्रेष्ठ आहे. विशेष म्हणजे ते नैसर्गिक असल्याने पूर्ण सुरक्षित आहे.
गव्हाचे तृणांकूर कुणासाठी ?
गव्हांकूर फक्त आजारी आणि रोगी यांच्यासाठी आहे, हा एक गैरसमज आहे. रोगी
आणि निरोगी अशा दोघांसाठी ते उपयुक्त असल्याचे डॉ. विग्मोर यांचे म्हणणे
आहे. रोगनिवारण करीत असल्याने रुग्णांसाठी तर रोगप्रतिबंधात्मक असल्याने
निरोगी असणा-यांसाठी ते आहे. दुधासारखाच तो एक संपूर्ण आहार आहे.
विविध आजार आणि गव्हांकूर
)      लैंगिक कमजोरीगव्हांकूर नैसर्गिक व्हिएग्रा सिध्द होत आहे.
मेंदूतील लिम्बिक सिस्टीम ला ते उत्तेजित करते. त्यामुळे लैंगिक आरोग्य
सुधारते. त्यातील , बी, जीवनसत्व आणि झिंक हा क्षार लाभदायक आहे.
जीवनसत्व कोलेस्ट्रॉल चरबीचे लैंगिक हार्मोन्समध्ये रुपांतर करते. बी
जीवनसत्व मानसिक ताण कमी होण्यास मदत करते. त्यामुळे लैंगिक हार्मोन्सचा
स्त्राव वाढतो आणि कामजीवन सुधारते. अँटी स्टरीलीटी विटामीन्स म्हणून
प्रसिध्द असणारे जीवनसत्व लैंगिक शक्ती वाढवते. कामशक्ती दीर्घकाळ
टिकवून ठेवण्यासाठी आणि कामजीवनाच्या नियमनासाठी प्रोस्टेट ग्रंथी निकोप
राहणे आवश्यक असते. यासाठी लागणारा झिंक हा क्षार यात आहे.
)      मधुमेहआहारातील पथ्ये, थोडासा व्यायाम, दोन्ही जेवणाच्या अगोदर
योग्य प्रमाणात गव्हांकूर या प्रयोगाने अनेकांनी आपला मधुमेह आटोक्यात आणला आहे.

No comments:

Post a Comment